भाषा परिवर्तन

Details About Our Astrology Marathi

ज्योतिष शास्त्र काय है ?
                      हे लेखन ज्यांना ज्योतिष येते त्यांच्यासाठी नाही. ज्यांना ज्योतिष अर्धवट येते अथवा
ज्योतिष शास्त्रा बाबत काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे. वाचकांनी प्रत्येक लाईन व्यवस्थीत वाचावी. कुठे ही विषयांतर झालेले नाही. वाचतांना तोच तो प्रकार जाणवणार नाही जरी यातील तुम्हाला काही विषय माहित असले. तरी, काही माहित नसतील. या विषयावरिल तुमचा अभिप्राय हा लिहुन उपयोग नाही. तो तुम्ही आम्हास फेसबूक अथवा वॉट्सप वर कळवावा.

विषय परिचय १ :                  
ज्योतिष शास्त्र जगाच्या ईतिहासात १०००० वर्षा पुर्वी निर्माण झाले आहे मानतात..
हे भारतीय वेदांतील एक मोठा विभाग आहे. याची खरी निर्मिती वेदात खुप
कमी शब्दात आहे आणि यास खऱ्या अर्थाने ज्योतिर्विद्या असे संबोधतात म्हणजे प्रकाश  टाकणारी विद्या. या वेदातील छोट्याश्या विभागाला ज्योतिष शास्त्रात श्री भृगु ऋषी, श्री पाराशर, श्री जैमिनी, श्री अगस्ती आणि अनेक विद्वानांनी कार्य केले
आणि श्री भृगु ऋषींनीच ७ कोटी जन्म कुंडल्यावर कार्य केले होते असे तज्ञ लोक मानतात.
ज्योतिष शास्त्राचा चांगला अभ्यास लंकेच्या रावणाचा सुध्दा होता.. म्हणुन त्याच्या रावण संहितेत
प्रचंड अशी माहिती लपलेली आहे जी पारंपारिक ज्योतिष शास्त्रात देखील पहावयास मिळत नाही.
अर्थात, प्रत्येकाने मोठे योगदान दिले आहे. या विषयाला अभ्यासणे अवघड आहे. ज्योतिष शास्त्रात
प्रथम, १२ स्थान [ 12 hous ]
- ९ ग्रह आणि त्यांचे कारकत्व, मित्र-शत्रु पक्ष, त्यांची दॄष्टी,
- ९ ग्रह आणि १२ स्थाना तुन निर्माण होणारे योग
जसे: अनफा-सुनफा, राजयोग, लक्ष्मी योग ईत्यादी ५००
- ९ ग्रह आणि ते ज्या नक्षत्रात आहेत त्याचे फल

दुसऱ्या टप्प्यात येतात
- गोचर विचार [ आजचे ग्रह व तुमची कुंडलीतील ग्रह यांचे परिक्षण ]
- महादशा आणि अंतर दशा ईत्यादी विविध दशा

तीसऱ्या टप्यात येतात
- १६ कुंडल्या म्हणजे षोडष वर्ग कुंडली

चौथ्या टप्प्यात
- प्रश्न कुंडली
अर्थात, ज्याच्याकडे कुंडली नाही त्याच्या साठी तात्पुर्ता बनवलेली कुंडली
आणि
काही आकस्मिक घटना बाबत माहिती घेण्यासाठी त्या वेळेची मांडलेली कुंडली

या सर्वांचा सारासार अभ्यास करुन फलित काढावे म्हणजे भविष्य सांगावे लागते
ज्योतिष शास्त्रात अजुन एक मोठी गोष्ट अशी आहे की

- १] पुर्व जन्म किंवा कोणता ही मागचा जन्म
- २] मृत्युची तारिख
- ३] पुढचा जन्म
- ४] पत्रिकेत जे त्रास अथवा आजार आहेत ते कोणत्या कर्मामुळे
हे सुध्दा ज्योतिष शास्त्रात सहज कळत असते.
मात्र, आजच्या तारखेला ज्योतिषी बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळतात. मुळ ज्योतिष शास्त्राचा अभ्यास किती ही वर्ष केला तरी कमी आहे.
      आम्ही जन्म कुंडली बनवुन देतांना  काही ग्रंथांचा समावेश करत असतो.

                 मुळ ज्योतिष शास्त्र म्हणजे एका जीवाची संपूर्ण कहाणी असते. ज्योतिष शास्त्र हे सर्व गणितावर आहे. ग्रह आणि नक्षत्रांवर आहे. नऊ ग्रह आणि सत्ताविस नक्षत्र  ईतकेच जरी असले तरी त्यांच्या पायऱ्या आहेत व त्या खोल खोल नेणाऱ्या असतात. भुतलावर सत्ता किंवा किरण जेथे जेथे ग्रहांची आणि नक्षत्रांची पडतील,  असतील त्या सर्वांचा अभ्यास ज्योतिष शास्त्र करु शकते.
                अर्थात, फक्त मानव जातीवर, मानव जीवांशी संबंधीत ज्योतिश शास्त्र नाही हे यातुन स्पष्ट होते.ज्योतिष शास्त्राचा मोठा नियम म्हणजे "काळ आणि वेळ" आहे. म्हणुनच ज्योतिष शास्त्र व नशिब असे समीकरण आहे. "काळ म्हणजे वर्ष, महिना, दिवस आणि स्थळ". तर "वेळ म्हणजे प्रसंग, घटना किंवा प्रश्‍न याचा समय किंवा निश्चित्ती !! म्हणुन नशिबात असे म्हणतात की " काळ आणि वेळ " आल्या शिवाय काही घडत नाही.
आणि
ग्रह नक्षत्र एकाच कक्षेत फिरत असतात. ते विशिष्ठ ठिकाणी फिरुन परत येतात. अगदी हेच श्री म‍द् भगवत गीतेत श्री कृष्णाने सांगितले आहे "काल चक्र". याचा अर्थ फक्त जन्म मरण नाही.
तर,
एखादी गोष्ट अपुर्ण असेल. कृती पुर्ण झाली नसेल तर तेच ग्रह आपल्याला ती कृती पुर्ण करायला
लावतात. मग, तुम्ही त्याला प्रारब्ध, नशिब म्हणा, योगायोग म्हणा किंवा कर्म अकर्म म्हणा..

हा झाला ज्योतिष शास्त्रातील मुळ गाभा.. त्याचे मुळ स्वरुप.. यात आता एखादी गोष्ट घडणार असेल
अथवा घडुन गेली असेल तर ती ज्योतिषातील अचुक अभ्यासातुन  सांगता येते.

विषय परिचय २ :

हा  ज्योतिष शास्त्रातील मुळ गाभा.. त्याचे मुळ स्वरुप.. यात आता एखादी गोष्ट घडणार असेल
अथवा घडुन गेली असेल तर ती ज्योतिषातील अचुक अभ्यासातुन  समजु शकते. ते सुध्दा आवश्यक असेल तरच.
कारण:
ज्योतिष शास्त्राला आपले स्वतःचे काही नियम आहेत. असे म्हणतात की ज्योतिष शास्त्र
हे ब्रम्हा जवळ बसलेल्या चित्र गुप्ताचे शास्त्र आहे. त्या चित्र गुप्तास ब्रम्हदेव जे सांगतात अथवा
चित्र गुप्तास जे माहित आहे व जे परम रहस्य आहे ते चित्र गुप्त प्रत्येकाच्या उगमाच्या वेळी
म्हणजे मानवाच्या जन्माच्या वेळी, झाडाच्या अंकुराच्या वेळी, निसर्गातील बदलांच्या वेळी जे
असेल ते ज्योतिष शास्त्राच्या माध्यमाने लिहित असतो आणि ज्योतिषास हे सर्व वाचता येते
पण, ज्योतिषाने हे ब्रम्ह वचन आहे ते उघड करायचे नसते या नियमा खाली राहुन ठराविक
बाबत ज्योतिष काही बोलणारे नसतात. त्यांना तसे बोलायची ज्योतिष शास्त्र परवानगी देत
नाही. हे नियम आपण आपलेच ज्योतिषाने पाळायचे असते अन्यंथा नियमांना किंमत, महत्व
दिले नाही तर, ज्योतिषाचा घडा भरतो. त्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात.

ज्योतिष शास्त्र हे आज काल सॉफ्टवेअरच्या माध्यमाने आले आहेच. पण, माझी पत्‍नि असे
म्हणते की जसे हे ठरलेले शास्त्र आहे. कधी काय घडणार हे आधीच ठरले आहे आणि ज्योतिष
यास डिकोड करतात तसे कालांतराने डॉक्टरी शास्त्रात असे मशिन, गॅजेट, ईक्युप्मेंटस येतील जे
मानवाच्याच नाही तर कोणत्या ही वस्तुला जोडुन त्याचे भविष्य व ईतिहास सांगु शकेल. सध्या
यात फक्त "डि एन ए" तंत्र विकसीत असुन डि एन ए चा अभ्यास अजुन पुर्ण झालेला नाही व तो
अभ्यास म्हणजे वरिल प्रमाणे डॉक्टरी क्षेत्रातील ज्योतिष शास्त्र असेल.

त्या वेळी आपण आपला अंत सर्वांना सांगु शकतो. कारण, जगातील बहुतांश गोष्टी या शास्त्रज्ञांनी
उघड केल्या आहेत व ज्योतिषातील रहस्य जे रहस्यच राहिले पाहिजे ते जर उघड केले काय होईल.

विचार थोडा सुक्ष्मात जाऊन:
विचारज्योतिष शास्त्रात ग्रह जरी आकाशात असले तरी, त्यांच्या कथा भारतीय भुमी वरील आहे. त्यांच्या गोष्टी एखाद्या मानवा प्रमाणे किंवा देवतां प्रमाणे कथेच्या रुपात सांगण्यात येतात. प्रत्येक ग्रहालाच नाही तर
प्रत्येक देवतास आणि ईतिहासास एक आराध्य स्थान मानले जाते. ते गोल फिरुन "गुरु" असते. अर्थात,
प्रत्येक ग्रहांचे गुरु आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक देवतांवर कोणाची तरी सत्ता आहे. सुक्ष्म परिक्षातुन लक्षात
येईल की कोणाचा ही गुरु हा ध्वनी आणि पोकळी आहे. असे तत्व आहे ज्यात सर्वांचा अर्क सामावलेला
आहे. थोडक्यात, पंच महाभुतांचे, ग्रहांचे आणि नक्षत्रांचे, देवांचे फलीत आणि तेज [ चैतन्य ] ज्या एका तत्वात
आहे त्यास आपण गुरु, संत असे संबोधतो. कारण, या तत्वावर, गुरु किंवा संत महात्म्यावर कोणत्याच
वातावरणाचा अथवा घटनेचा परिणाम होत नाही. किंबहुना, जे चराचरावर सत्ता गाजवतात ते ज्यांच्यावर सत्ता
गाजवू शकत नाही ते महात्मा, गुरु, संत म्हणवले जातात. असा एकमेव आहे तो म्हणजे साक्षात श्री गुरु
दत्त !!.. श्री गुरु दत्तात्रेय यांचा एक मेव ग्रंथ श्री दत्त प्रबोध वाचल्यावर श्री दत्तात्रेय मानव रुपात कसे मॅट्रिक्स
आहेत हे कळते. अर्थात, श्री दत्त महाराज हे कुठे ही व कोणत्या ही फॉर्म मधे अवतरीत होऊ शकतात आणि
काही ही करु शकतात.
श्री दत्तात्रेय हे आज तत्व आहे. त्यांना अनुभवणे किंवा पाहणे शक्य नाही. त्यांचे जे जे अवतार म्हणजे श्री दत्त
अवतार म्हणतात त्यांना साधनेच्या जोरावर अनुभवता येऊ शकते अथवा श्री दत्ताची मुर्ती, फोटो पाहुन ध्यानी, मनी, स्वप्नी पाहता येते. या बाबत श्री दत्त माला मंत्र मोठे कार्य करते. श्री दत्त माला मंत्र युट्युबवर तुम्हाला सविस्तर कळेल.
मात्र, ते सर्व थैव मानस शास्त्र आहे. [म्हणजे मानले तर ] श्री दत्त तत्वा प्रमाणेच विविध संत, महात्मे, गुरु जन महत्वाचे व त्या खालो खाल पवित्र आत्मे..
पवित्र आत्मा का ? कारण, ज्यांने जगातील प्रचंड अनुभव घेतले व ज्यांच्या वर पुर्ण कृपा झाली असा कोणी
व्यक्ती मृत होतो तो मोक्षास जातो म्हणजे सर्व बंधनातुन सुटतो व पाहिजे तेथे पाहिजे तसा विचरण करु
शकतो.  हा विषय पवित्र व उच्च कोटीचे मृत आत्म्यांचा आहे. नुसत्या आत्म्यांचा अथवा पिशाच्चाचा नाही.
कारण, सामान्यतः म्रुत आत्म्यांवर सुध्दा ग्रह ताऱ्यांचे फेरे लागु आहेत. 

या मंडळींवर ग्रहांचे परिणाम होत नाही. ज्याला ग्रहांच्या पलिकडे जायचे त्यांनी या तत्वास धरावे अथवा
अनुसरावे. असा कोणी असला म्हणला की मी यांना मानतो ग्रहांना नाही अथवा मी कर्माला मानतो, ईच्छा
शक्तीला मानतो. मी नास्तिक आहे मी ग्रहांना मानत नाही तो सुध्दा ग्रह-नक्षत्रांच्या फेऱ्यात असतो.
थोडक्यात काय तर,
ग्रह आणि नक्षत्र हे जे घडणार ते घडवतातच टळत नाही. जर का टाळायचे असेल अथवा त्याचा मार्ग बदलवायचा असेल. तीव्रता कमी करायची असेल तर, पुर्ण अध्यात्माला "शिकुन" अनुसरावे. मग,
नक्कीच एखाद्याचे नशिब वेळेच्या आधी बदलु शकते अथवा अशुभ टळू शकते. आपण अनेक ठिकाणी ऐकतो
पाहतो की काही घटना टळलेल्या आहेत. त्या कोणा मुळे याचे वेगळे उत्तर द्यायला नको.

ज्योतिष शास्त्रात उपाय किंवा तोडगे, सेवा अथवा उपासना हा प्रकार नव्हता तो अभ्यासांती तंज्ञांनी षोडश
कुंडली वर्ग साधनाच्या माध्यमाने आणला. तसे ज्योतिष शास्त्र म्हणजे अटळ असलेल्या घटना सांगणारे
शास्त्र आहे.  यात पुन्हा तो मुद्दा उपस्थीत होतो की मुळ ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या शांत्या लिहिलेल्या नाही
तर, आपण जे काही शांत्या किंवा पुजा अथवा सेवा-तोडगे-उपासना करतो त्या कृती, क्रिया आपल्याला भक्कम  बनवतात. आपल्यातील निगेटिव्हीटी घलवतात. जसे तापाच्या रोग्याला आधी औषध ताप जाण्यासाठी. त्यानंतर मग, विकनेस घालवण्यासाठी.
विषय परिचय ३:

मुळ ज्योतिष शास्त्रात जसे भुत भविष्य वर्तमान वाचता येत आहे तसेच, आरोग्य शास्त्र सुध्दा प्रमुख आहे.
कोणता आजार १] होणार, २] होईल, ३] कधी झाला ४] किती दिवस राहिल ५] त्याचे गंभीर किंवा सौम्य
परिणाम कसे असतील ६] कोणत्या ग्रहाच्या किंवा कर्माच्या किंवा कोणत्या अन्य कारणाने झाला आणि
७] आजार शारीरिक आहे की अजुन दुसरा कोणता व तो आजार कधी जाईल. हे सर्व लिहिले असते. त्यासाठी
उपाय मात्र नाही. ज्योतिष शास्त्रात उपाय कोणी शोधुन काढले हे सांगता येणे कठीण आहे. पण, आजार निवारण होण्यासाठी उपाय १] मंत्र शास्त्र २] अश्‍विनी कुमार ३] सोम म्हणजे चंद्र आणि ४] धनवंतरी यांनी शोधले आहेत  किंवा दिले आहेत. आरोग्याचा आणि धनाचा जवळचा संबंध असल्याने धनवंतरीची पुजा दिवाळीला केली जाते.

आता ज्योतिष शास्त्र कसे आहे आणि त्यातुन भुत भविष्य वर्तमान कसे पाहिले जाते हे आपण अगदी
थोडक्यात जाणुन घेऊ या. त्यासाठी आपण नंबरर्स प्रमाणे जाऊ.

१] जन्म कुंडलीत मुख्य दोन कुंडल्यास असतात. राशी कुंडली आणि जन्मलग्न कुंडली.
सर्व मंडळी जन्मकुंडली पहिली पाहतात.
२] त्यानंतर, नवमांश कुंडली थोडे सुक्ष्मात जाण्यासाठी आहे.
३] त्यानंतर मात्र १६ कुंडल्या असतात.

मुळ पहिली कुंडली पाहतांना
१] पत्रिकेतील १२ रकाने किंवा खाते. त्यास घर किंवा स्थान म्हणतात आणि ही स्थान सर्वच
विषयांना घेतात. प्रत्येक घरात अनेक विषय असतात. जसे: सप्तम स्थान म्हणजे सातवे घर.
यात शरीरातील पोटाचे सर्व अवयव, जीवनातील वैवाहिक भागीदार, व्यवसायातील भागिदार,
आजोबा ईत्यादी अनेक. प्रत्येक ग्रहांची सत्ता राशीवर असते. जो ग्रह जसा असेल तसे त्या एकाच
स्थानावर कोणता विषय नक्की सांगयचा.. पोट, की आजोबा कि पत्‍नि असे ठरते.
२] प्रत्येक घरात अंक असतात म्हणजे आकडे. हे आकडे म्हणजे घर नंबर नसुन राशी असतात.
प्रत्येक राशीला मित्र ग्रह आणि शत्रु ग्रह असतात. जसे: चंद्राची राशी कर्क असेल चंद्राची शत्रु राशी
वृश्चिक असेल आणि चंद्र वृश्चिक राशीत असेल तर तो चंद्र निचीला अथवा शुभ नाही.
३] प्रत्येक ग्रह + राशी कोणत्या तरी नक्षत्रावर असतात आणि नक्षत्रांना सुध्दा ग्रह असतात.
४] प्रत्येक ग्रह ज्या घरात आहे तेथुन ७व्या घरात पाहतो. काही ठरावीक ग्रह सात पेक्षा जास्त घरावर
आपली शुभ अशुभ दृष्टी ठेवतात.
५] काही ज्योतिषी मानतात की कोणता ही [ तो ज्या घरात असेल तेथुन ] जेव्हा ४, आठव्या आणि सहाव्या घरात
पाहतो ते शुभ नसते.
६] प्रत्येक ग्रह प्रवास करणारे असतात अर्थातच ग्रह फिरतात. एका व्यक्तीचा जन्म १९७८ जुन मधील ६ तारखेचा असेल तर त्याच्या काही तासात किंवा काही दिवसात ते ग्रह दुसऱ्या राशीत व घरात दिसतात. भविष्य पाहतांना असेच आजचे ग्रह व पत्रिका दाखवणाऱ्या व्यक्तीच्या मुळ जन्मकुंडली म्हणजे पत्रिकेतील ग्रह यांची सांगड घालून पहावे लागते. 

हे झाले प्राथमिक स्वरुप. प्राथमिक स्वरुप अजुन बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातील अगदी थोडक्यात असे की:
ग्रहा मध्ये सुध्दा मित्र व शत्रुत्व असते. एकाच स्थानात दोन ग्रह आहेत. [ ते सुध्दा कोणत्या स्थानात म्हणजे
घरात दोन ग्रह एकत्र आहेत ] आणि हे दोन ग्रह परस्परांचे मित्र नाहीत तर तेथे भविष्य किंवा अभ्यास बदलतो. हेच एकमेकांचे शत्रु ग्रह कुठे कुठे पाहत आहेत व उच्चीला यातील कोणता ग्रह किंवा नीचीला आहे हे सुध्दा पहावे लागते.
विषय परिचय ४:

या नंतर दुसऱ्या टप्प्यात अजुन खोलात जावे लागते. जसे: नक्षत्र आणि करण, योग ईत्यादींचे सुध्दा भविष्य आपले वेगळे असते. नुसते नक्षत्र पत्रिकेत नसुन "योग" व "करण" हा सुध्दा प्रकार असतो. याशिवाय, अचुक निदान किंवा भविष्य पाहण्यासाठी "महादशा" प्रकरण पहावे लागते.

"महादशा" म्हणजे आजचे ग्रह "त्या" कुंडलीवर प्रभाव टाकत असतात. तसेच, महादशेत सुध्दा कोणता ग्रह सुरु
आहे व त्याचा प्रभाव कसा आहे हे पहावे लागते. आजचे ग्रह + महादशेचे ग्रह पाहुन षोडष कुंडलीचा अभ्यास करता येतो. एखादा ग्रह अशुभ राशीत किंवा शत्रु ग्रहा बरोबर अथवा अशुभ स्थानी आहे आणि तोच ग्रह सध्या
[ आज ] तेजीत आहे तर फल अशुभ मिळतात व तसेच  एखादा ग्रह अशुभ राशीत किंवा शत्रु ग्रहा बरोबर अथवा अशुभ स्थानी आहे आणि त्या ग्रहाची महादशा सुरु असेल तर त्रास असतात व त्यात ही अंतरदशा, प्रति अंतरदशा, सुक्ष्म दशा असतात.
यातील अंतर दशे बाबत थोडक्यात असे की महादशा कोणत्या तरी एका प्रमुख ग्रहाची सुरु आहे आणि त्यात त्याखालो खाल अजुन काही ग्रह क्रमाने येतात त्या क्रमवार ग्रहांवर मुख्य महादशेचा जो कोणता ग्रह असेल तो प्रभाव टाकतो व त्याचा प्रभाव तेवढ्या काळासाठी होतो असे एकात एक आणि अजुन एकात एक असे " महादशा त्यात, अंतरदशा त्यात, प्रति अंतर दशा, त्यात ही सुक्ष्म दशा  येतात.

येवढा अभ्यास पुर्ण करावा लागतो म्हणुन ज्योतिष शास्त्रीला दर्जा, सन्मान, आदर दिला जातो. काही मंडळी या सखोल अभ्यासाला टाळतात अथवा एकीकडे अभ्यास करत करत व्यवसाय सुरु करुन देतात म्हणजे  पटकन ज्योतिषी बनतात कींवा पामेस्ट्री शिकतात. पामेस्ट्री आणि ज्योतिष शास्त्रात फार फरक  नाही. तरी देखील पामेस्ट्री ही सखोल असते. ज्योतिष घ्या अथवा पामेस्ट्री, दोन कायद्यांवर किंवा स्वरुपावर कार्य करते.
*१] व्यक्तीचे नशिब आणि कर्म
*२] ज्योतिषी किंवा पामेस्टला असलेली वाचा सिध्दी...

जर एखाद्याने भविष्य केले की या तारखेला लग्न होईल व या काळात संतान
तर,
लग्न होते पण संतान होण्या ऐवजी डायवर्स होतो. यात बहुतांश ज्योतिषांना लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागतात. पत्रिका दाखवणारा सरळ असे म्हणतो की तुमचे भविष्य खोटे ठरले. मात्र त्यांचे खरे कारणं
(*२) येथे लिहिले आहे.
अजुन महत्वाचे म्हणजे :
ज्योतिष पामिस्ट कोणी ही असो. त्यांच्याकडे लोकांना अनुभव कसा मिळतो. लोकांची काम होत आहेत का?
हे आपण पाहतो. त्याचे शिक्षण किती झाले हे जाणण्याच्या ऐवजी तो किती अनुभवी आहे हे माहित करुन घेतो. आपल्याला जर अनुभव नाही आले किंवा काही दिवस Yआपल्याला अनुभव येत गेले आणि एखादे काम नाही झाले म्हणजे आपण त्या ज्योतिष पामिस्टला बोलायला नको आहे. कारण जे घडणार ते घडतेच आपली श्रध्दा कमी होते.

विषय परिचय ५:

ज्योतिष किंवा पामिस्टकडे आपण जेव्हा जातो त्यावेळी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ?

१] ज्योतिष असो किंवा पामिस्ट वरिल प्रमाणे सर्व नियम डॉक्टर व पेशंट यातील नाते जसे असते तेच येथे लागु असतात.

२] आपल्या जीवनात ज्या गोष्टी कोणाच्या माध्यमाने होतात. मग, डॉक्टर असो किंवा कोणी ही आपले काम करणारा हा माध्यम असतो. आपण डॉक्टरला आपण फक्त एक माध्यम जरी म्हणालो तरी, त्याला  फी देतो कारण तो आपले प्रॉब्लेम जाण्यात एकमेव [ अनेक लाख डॉक्टरांतुन ] तोच एक माध्यम महत्वाचा असतो. पण, आपण अनेक डॉक्टरांकडे फिरतो आपल्याला रिझल्ट मिळत नाही आणि काहींना एकाच डॉक्टर मधुन सर्व प्रश्न सूटतात. याचा अर्थ असा नाही की शुभ ग्रह आले अथवा योग्य डॉक्टर भेटला किंवा योगा योगाने
झाले. [ म्हणजे: कावळा बसला आणि फांदी तुटली ] हे कारण खरे नाहीये. खरे कारण आपली शुध्द व उच्च ईच्छा शक्ती, तो काळ ज्याने ते कार्य पुर्णत्वास जाणार आहे. हे समजणे जरा कठिण आहे म्हणुन पुढील मुद्दा समजुन घ्या.

३] जीवनातील अडचणी घालवण्यासाठी कोणाच्या ही माध्यमाने आपले काम होण्यासाठी आपली ईच्छाशक्ती
तीव्र पाहिजे. चिकाटी पाहिजे, श्रध्दा आणि विश्‍वास पाहिजे. या पेक्षा अजुन एक महत्वाचे म्हणजे सबुरी पाहिजे. अनेक ठिकाणी फिरुन शेवटी एका ठिकाणी काम होतेच. मग, अनेक ठिकाणी फिरण्याची गरज काय ?
एका ठिकाणा हुन दुसरीकडे जाणे म्हणजे नव्याने सुरु करणे आहे.
म्हणुन,
पामिस्ट असो वा ज्योतिष किंवा डॉक्टर एकाच ठिकाणी चिकाटीने रहा. त्याच्याच कडुन काम होईल हा आदेश तुमच्या अंतर मनाला द्या. ज्याकडे आपण आलो किंवा जो जे कोणते काम करेल तो परमेश्‍वर
अथवा
गुरु समजा. तो जे काही सांगेल त्याला अनुसरा व श्रध्दा, विश्‍वास व भक्ती ठेवा. किती ही असो गुरु सुध्दा नशिब बदलवत नाही. ते त्यातल्या त्यात थोडा फेर फार करतात.

" नसिब बदलना गुरु कृपा पे  निर्भर है गुरु कृपा उनके  परिक्षा मे पास होने से है "

महत्वाची माहिती:

ज्योतिष शास्त्रात भविष्य देण्यात येते त्याचे क्रम :
ज्योतिष शास्त्राच्या अथवा पत्रिकेच्या माध्यमाने काय काय जाणुन घेऊ शकतात.

१]   स्वभाव:
२]  आरोग्य:
३]  शिक्षण:
४] कला- छंद:
५]  नोकरी किंवा व्यवसाय:
६]  विदेश यात्रा:
७]  घरातील परिवार व ईतर नातेवाईक:
८]  विवाह, प्रेम, पत्‍नि:
९]  संतान-मुलबाळ:
१०]  भाग्योदय काळ:
११] शत्रु - मित्र:
१२] प्रॉप्रटी व ईतर लाभ:
१३] शुभ आणि अशुभ काळ:
१४] महादशा आणि साडेसाती काळ :
१५] अंक शास्त्र:
१६] वास्तु शास्त्र:
१७] अध्यात्म शास्त्र:
१८] गत जन्म [ पुर्व जन्म ]:
१९]  उपाय तोडगे:
२० ] काही ईतर अजुन

टिप:
अ] वरिल प्रकारची कुंडली बनवण्यास
१ महिना लागतो किंवा त्या पेक्षा जास्त दिवस लागु शकतात.
ज्यांना पत्रिका बनवुन नको असेल त्यांना फक्त एका बैठकीत
जेवढे भविष्य देता येईल तेवढे देता येत असते. पण, तसे सांगावे
लागते. वेगळी वेळ द्यावी लागते.

आ] उपाय:
पत्रिका पाहुन काही उपाय तुम्हाला करायला सांगण्यात येतात
ते उपाय चिकाटी, निस्वार्थ वृत्तीने, पुर्ण विश्‍वास ठेऊन करावे लागतात.
किती दिवसाचे उपाय असतात ते सांगता येत नाही. ते पत्रिकेवर अवलंबुन
असतात.

इ] तुम्हाला सांगितलेली उपासना झाली की आम्ही स्वतः प्रश्‍न कर्त्यासाठी
अनुष्ठान करत असतो.
अनुष्ठान:
आजच्या युगात ज्योतिषाने किंवा कोणी कोणते उपाय दिले तर ते जसे पाहिजे तसे होत नाही.
त्यांना योग्य प्रकारे वेळेचे आणि योग्य मार्गदर्शन नसल्याने आणि आपला प्रॉब्लेम कसा आहे,
किती जुना आहे आणि किती मुरला आहे हे माहित नसल्याने. या सह त्यांना समाधानकारक
वेळ देता येऊ शकत नसल्याने आम्ही स्वतः ११, २१. ४१, आणि पुढे सुध्दा त्यांच्यासाठी आम्ही
सेवा करतो.
सेवा, अनुष्ठान  काय करतो?१] रेकी देणे, काम व्हावे यासाठी रेकी आणि ध्यानाच्या माध्यमाने आदेश सोडणे.
२] श्री दत्त महाराजांच्या पादुकांवर अभिषेक करणे. आणि ईतर काही जे पुढे दिलेले आहे.
मात्र, यासाठी अटी:
आम्ही लाख सेवा कोणासाठी केली जरी, तरी साधकाला सुध्दा सेवा करावी लागते. त्याला ही काही नियम
पाळावे लागते.साधक स्वार्थी नसावा. त्याचा विश्‍वास असावा. तो आम्हाला न कळवता अजुन १० ठिकाी फिरणारा नसावा. त्याच्यात शुध्द भक्ती आणि प्रेम असावे.
जीवनात यश न येण्याचे कारण खालील असतात.
१] ऋण :      कोणत्या ही प्रकारचे राहुन गेलेले काम अथवा सुक्ष्मा पासुन मोठे कर्ज.
२]  वैर :       काया वाचा मनाने जे वागले जाते त्यात नावडते ते असते त्यातुन निर्माण होते.
३]  हत्या :   शुभ विचार व शुभ चिंतन.
४] पाप :      काया वाचा मनाने कोणते ही असे कर्म करु नये जेणे करुन निगेटिव्हटी येईल.
५]  शाप :     कोणशी नाते असेच असावे कि सर्वांचे प्रेम मिळावे आणि हा न्याय प्राण्याशी सुध्दा लागु आहे म्हणुन मासाहार वर्ज करावा.
६] कर्म :     जाणते आणि अजाणते पणातील, या आणि मागच्या जन्मातील.
७] त्याग:   षडरिपुंवर ताबा मिळवुन विल पॉवर वाढवणे.

या मुळे आपण कीती उपासना केली तरी ती अपुरी राहते. प्रश्‍न कर्त्यास सेवा सुध्दा द्यावी आणि
त्यासाठी आपण सुध्दा सेवा करावी. अशी आम्ही स्वतः सेवा करतो आणि आमच्या सेवेत आम्ही
रेकीला प्रार्थना आणि आमच्या अतरमनाला आदेश करतो. या शिवाय
काही उपासना सुध्दा साधकांसाठी स्वतः करतो..
१] पंचमहाभुताची सेवा.
२] श्री दत्ताची
३] श्री देवीची आणि
४] व्यक्ती परत्वे अजुन ईतर...

मात्र,
या सेवेत आम्ही कटाक्षाने सात्विकता बाळगतो,.
जादु टोणा, तंत्रिकी प्रकार नसतात. कारण, तंत्र म्हणजे काय हेच लोंकाना कळालेले नाही.
आम्ही मानतो की शत्रु पिडा असते, ब्लॅक मॅजीक, भानामती-मुठमारी, अघोरी, करणी, वशिकरण, जारण, मारण, उच्चाटन ईत्यादी सर्व असतात. ईतकेच नाही तर आम्हाला ही त्याचे त्रास होत असतात. पण, किती ही असले तरी या बाबत आम्ही कधी चर्चा करत बसण्या पेक्षा उपाय सांगतो. उपाय तो ही असा की आपला शत्रु हा आपला मित्र बनावा. त्याच्यातील भावना बदलाव्या. कोणती ही गोष्ट विनाकारण होत नसते. त्याच्या मागे आपण ही कारणीभूत असतो. आम्ही कधी कोणाला शत्रुचे नाव सांगत नाही. तशी आम्हाला ज्योतिषाने परवानगी सुध्दा दिलेली नाही. उलट अशी उपासना सांगावी की
१] आपला शत्रु नक्की कोण हे आपल्याला आपलेच कळेल.
२] अंगात बाधा, भुत प्रेत शिरले असेल तर, तो आत्मा कसा प्रेमळ बनेल असे उपाय सांगत असतो.

ई] या शिवाय रेकी शिकवणे किंवा काही विविध उपासनांवर सिडी बनवऊन देत असतो.

_________________________________________________________________________________

माझे स्वतःचे विचार:

हे वाचन केल्यावर तुम्हाला असे लक्षात येईल की किंवा मनात येईल की येथे येऊन भेटणे आवश्यक आहे.
योग्य मार्ग मिळेल. कारण,
मी फक्त ज्योतिष शास्त्री नाही. मी कर्माच्या सिध्दांताला आणि पुर्ण विश्‍वास व निस्वार्थ सेवेला मानतो.
गुरु तत्वाला मानतो त्यामुळे मला ज्योतिषाच्याच नाही तर अनेक माध्यमाने मुळ शोधता येतो. मी सांगितलेले कारण कोणाला पटते कोणाला नाही. पटले तर प्रश्न कर्त्याला लवकर फायदा होतो. जरी
पटले नाही तरी कालांतराने प्रश्‍न कर्त्यास ते पटतेच. ईतकेच घडते की प्रश्‍न कर्त्याचा वेळ व काळ वाया
जातो.

ज्योतिषात प्रश्‍न कर्ते प्रमुख प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर योग्य आणि पुर्ण जवाबदारीने द्यायची असतात.
१] नोकरी, व्यवसाय: कसा मिळेल आणि कसा शोधायचा आणि त्यासाठी ज्योतिष शास्त्रातील काय उपाय करायचे. उपाय सोपे आणि ज्योतिष शास्त्रा शिवाय अजुन कोणते असतात ते सुध्दा.. त्यात असलेल्या अडचणीेचे मुळ कारण काय ते सुध्दा सांगण्यात येते.
२] लग्न: का होत नाही आणि कधी होईल. कुठे आणि कसे होईल,. लग्ना नंतर कशी परिस्थीती असेल. बायको अथवा नवऱ्याने लग्ना नंतर कसे वागावे. कोणते अडथळे आयुष्यात येऊ शकतात. लग्न कुठे कसे आणि कोणत्या व्यक्तीशी होईल आणि ते होण्यासाठी उपाय सोपे आणि ज्योतिष शास्त्रा शिवाय अजुन कोणते असतात ते सुध्दा.. त्यात असलेल्या अडचणीेचे मुळ कारण काय ते सुध्दा सांगण्यात येते.
३] संतान: या बाबत जेवढे देता येईल तेवढे. त्यासाठी संतान जन्माला येण्या आधी पति-पत्‍निची कुंडली आणि लग्न झाल्याची तारिख. 
४] डायव्हर्स : शक्य तो डायव्हर्स होऊच नये. का होत आहे याचे कारण आणि डायव्हर्स झाला तर दुसरे लग्न कधी आणि होईल की नाही ईत्यादी.
५] वाहन, प्रॉपर्टी
६] मित्र आणि शत्रु

आम्ही जी कुंडली बनवतो त्याचा प्रकार पिकासावर पाहण्यासाठी संपर्क करावा.
पिकासा शिवाय जन्म पत्रिकेचे मोड्युल, काही महत्वाचे अन्य पोस्ट आणि फोटो
तुम्ही येथे, या ब्लोगवर 

या शिवाय आमच्या बाबत ईतर काही माहिती जाणुन घ्यायची असल्यास आमच्या
ईतर ब्लॉगवर जाणे तसेच, फेसबूकच्या माध्यमाने जाणुन घेणे.

श्री बाळकृष्ण महाराजांची अगदी थोडक्यात माहिती पुढील लिंक वरुन पहावी.
www.balkrishnamaharajm.blogspot.com
www.vedangee.blogspot.com
या ब्लोगवर मधुन मधुन पोस्टींग केले जात राहिल.

हा ब्लॉग कोणासाठी आहे..

१] ज्यांना योग्य मार्ग सापडत नाही.

२] चांगले सहकार्य सर्वांना करुन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सिध्दीस जावा यासाठी आणि

३] श्री सद्‍गुरुंच्या मार्गदर्शनाने ज्यांचे "आत्म परिक्षण" झाले आहे.. अथवा, करुन घेण्याची ईच्छा ठेवतात.

४] ज्यांना कळाले की आपला हा जन्म बहु मोल आणि मुल्यवान आहे. विना कारणची प्रॉप्रटी, पैसा, ईतरांच्या जीवनात जे ढवळा ढवळ करत नाही..व पुन्हा हा जन्म मिळणार नाही हे ज्यांना कळाले व या जन्माचे सार्थक ज्यांना करुन घेता येत असेल.
**********************************************************

" नसिब बदलना गुरु कृपा पे  निर्भर है । गुरु कृपा उनके  परिक्षा मे पास होने से है "

महत्वाची माहिती:

ज्योतिष शास्त्रात भविष्य देण्यात येते त्याचे क्रम :
ज्योतिष शास्त्राच्या अथवा पत्रिकेच्या माध्यमाने काय काय जाणुन घेऊ शकतात.

१]   स्वभाव:
२]  आरोग्य:
३]  शिक्षण:
४] कला- छंद:
५]  नोकरी किंवा व्यवसाय:
६]  विदेश यात्रा:
७]  घरातील परिवार व ईतर नातेवाईक:
८]  विवाह, प्रेम, पत्‍नि:
९]  संतान-मुलबाळ:
१०]  भाग्योदय काळ:
११] शत्रु - मित्र:
१२] प्रॉप्रटी व ईतर लाभ:
१३] शुभ आणि अशुभ काळ:
१४] महादशा आणि साडेसाती काळ :
१५] अंक शास्त्र:
१६] वास्तु शास्त्र:
१७] अध्यात्म शास्त्र:
१८] गत जन्म [ पुर्व जन्म ]:
१९]  उपाय तोडगे:
२० ] काही ईतर अजुन
*********************************

टिप:
अ] वरिल प्रकारची कुंडली बनवण्यास
१ महिना लागतो किंवा त्या पेक्षा जास्त दिवस लागु शकतात.
ज्यांना पत्रिका बनवुन नको असेल त्यांना फक्त एका बैठकीत
जेवढे भविष्य देता येईल तेवढे देता येत असते. पण, तसे सांगावे
लागते. वेगळी वेळ द्यावी लागते.

आ] उपाय:
पत्रिका पाहुन काही उपाय तुम्हाला करायला सांगण्यात येतात
ते उपाय चिकाटी, निस्वार्थ वृत्तीने, पुर्ण विश्‍वास ठेऊन करावे लागतात.
किती दिवसाचे उपाय असतात ते सांगता येत नाही. ते पत्रिकेवर अवलंबुन
असतात.

इ] तुम्हाला सांगितलेली उपासना झाली की आम्ही स्वतः प्रश्‍न कर्त्यासाठी
अनुष्ठान करत असतो.
अनुष्ठान:
आजच्या युगात ज्योतिषाने किंवा कोणी कोणते उपाय दिले तर ते जसे पाहिजे तसे होत नाही.
त्यांना योग्य प्रकारे वेळेचे आणि योग्य मार्गदर्शन नसल्याने आणि आपला प्रॉब्लेम कसा आहे,
किती जुना आहे आणि किती मुरला आहे हे माहित नसल्याने. या सह त्यांना समाधानकारक
वेळ देता येऊ शकत नसल्याने आम्ही स्वतः ११, २१. ४१, आणि पुढे सुध्दा त्यांच्यासाठी आम्ही
सेवा करतो.
सेवा, अनुष्ठान  काय करतो?१] रेकी देणे, काम व्हावे यासाठी रेकी आणि ध्यानाच्या माध्यमाने आदेश सोडणे.
२] श्री दत्त महाराजांच्या पादुकांवर अभिषेक करणे. आणि ईतर काही जे पुढे दिलेले आहे.
मात्र, यासाठी अटी:
आम्ही लाख सेवा कोणासाठी केली जरी, तरी साधकाला सुध्दा सेवा करावी लागते. त्याला ही काही नियम
पाळावे लागते.साधक स्वार्थी नसावा. त्याचा विश्‍वास असावा. तो आम्हाला न कळवता अजुन १० ठिकाी फिरणारा नसावा. त्याच्यात शुध्द भक्ती आणि प्रेम असावे.
जीवनात यश न येण्याचे कारण खालील असतात.
१] ऋण :      कोणत्या ही प्रकारचे राहुन गेलेले काम अथवा सुक्ष्मा पासुन मोठे कर्ज.
२]  वैर :       काया वाचा मनाने जे वागले जाते त्यात नावडते ते असते त्यातुन निर्माण होते.
३]  हत्या :   शुभ विचार व शुभ चिंतन.
४] पाप :      काया वाचा मनाने कोणते ही असे कर्म करु नये जेणे करुन निगेटिव्हटी येईल.
५]  शाप :     कोणशी नाते असेच असावे कि सर्वांचे प्रेम मिळावे आणि हा न्याय प्राण्याशी सुध्दा लागु आहे म्हणुन मासाहार वर्ज करावा.
६] कर्म :     जाणते आणि अजाणते पणातील, या आणि मागच्या जन्मातील.
७] त्याग:   षडरिपुंवर ताबा मिळवुन विल पॉवर वाढवणे.

या मुळे आपण कीती उपासना केली तरी ती अपुरी राहते. प्रश्‍न कर्त्यास सेवा सुध्दा द्यावी आणि
त्यासाठी आपण सुध्दा सेवा करावी. अशी आम्ही स्वतः सेवा करतो आणि आमच्या सेवेत आम्ही
रेकीला प्रार्थना आणि आमच्या अतरमनाला आदेश करतो. या शिवाय
काही उपासना सुध्दा साधकांसाठी स्वतः करतो..
१] पंचमहाभुताची सेवा.
२] श्री दत्ताची
३] श्री देवीची आणि
४] व्यक्ती परत्वे अजुन ईतर...

मात्र,
या सेवेत आम्ही कटाक्षाने सात्विकता बाळगतो,.
जादु टोणा, तंत्रिकी प्रकार नसतात. कारण, तंत्र म्हणजे काय हेच लोंकाना कळालेले नाही.
आम्ही मानतो की शत्रु पिडा असते, ब्लॅक मॅजीक, भानामती-मुठमारी, अघोरी, करणी, वशिकरण, जारण, मारण, उच्चाटन ईत्यादी सर्व असतात. ईतकेच नाही तर आम्हाला ही त्याचे त्रास होत असतात. पण, किती ही असले तरी या बाबत आम्ही कधी चर्चा करत बसण्या पेक्षा उपाय सांगतो. उपाय तो ही असा की आपला शत्रु हा आपला मित्र बनावा. त्याच्यातील भावना बदलाव्या. कोणती ही गोष्ट विनाकारण होत नसते. त्याच्या मागे आपण ही कारणीभूत असतो. आम्ही कधी कोणाला शत्रुचे नाव सांगत नाही. तशी आम्हाला ज्योतिषाने परवानगी सुध्दा दिलेली नाही. उलट अशी उपासना सांगावी की
१] आपला शत्रु नक्की कोण हे आपल्याला आपलेच कळेल.
२] अंगात बाधा, भुत प्रेत शिरले असेल तर, तो आत्मा कसा प्रेमळ बनेल असे उपाय सांगत असतो.

ई] या शिवाय रेकी शिकवणे किंवा काही विविध उपासनांवर सिडी बनवऊन देत असतो.

_________________________________________________________________________________

माझे स्वतःचे विचार:

हे वाचन केल्यावर तुम्हाला असे लक्षात येईल की किंवा मनात येईल की येथे येऊन भेटणे आवश्यक आहे.
योग्य मार्ग मिळेल. कारण,
मी फक्त ज्योतिष शास्त्री नाही. मी कर्माच्या सिध्दांताला आणि पुर्ण विश्‍वास व निस्वार्थ सेवेला मानतो.
गुरु तत्वाला मानतो त्यामुळे मला ज्योतिषाच्याच नाही तर अनेक माध्यमाने मुळ शोधता येतो. मी सांगितलेले कारण कोणाला पटते कोणाला नाही. पटले तर प्रश्न कर्त्याला लवकर फायदा होतो. जरी
पटले नाही तरी कालांतराने प्रश्‍न कर्त्यास ते पटतेच. ईतकेच घडते की प्रश्‍न कर्त्याचा वेळ व काळ वाया
जातो.

ज्योतिषात प्रश्‍न कर्ते प्रमुख प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर योग्य आणि पुर्ण जवाबदारीने द्यायची असतात.
१] नोकरी, व्यवसाय: कसा मिळेल आणि कसा शोधायचा आणि त्यासाठी ज्योतिष शास्त्रातील काय उपाय करायचे. उपाय सोपे आणि ज्योतिष शास्त्रा शिवाय अजुन कोणते असतात ते सुध्दा.. त्यात असलेल्या अडचणीेचे मुळ कारण काय ते सुध्दा सांगण्यात येते.
२] लग्न: का होत नाही आणि कधी होईल. कुठे आणि कसे होईल,. लग्ना नंतर कशी परिस्थीती असेल. बायको अथवा नवऱ्याने लग्ना नंतर कसे वागावे. कोणते अडथळे आयुष्यात येऊ शकतात. लग्न कुठे कसे आणि कोणत्या व्यक्तीशी होईल आणि ते होण्यासाठी उपाय सोपे आणि ज्योतिष शास्त्रा शिवाय अजुन कोणते असतात ते सुध्दा.. त्यात असलेल्या अडचणीेचे मुळ कारण काय ते सुध्दा सांगण्यात येते.
३] संतान: या बाबत जेवढे देता येईल तेवढे. त्यासाठी संतान जन्माला येण्या आधी पति-पत्‍निची कुंडली आणि लग्न झाल्याची तारिख.
४] डायव्हर्स : शक्य तो डायव्हर्स होऊच नये. का होत आहे याचे कारण आणि डायव्हर्स झाला तर दुसरे लग्न कधी आणि होईल की नाही ईत्यादी.
५] वाहन, प्रॉपर्टी
६] मित्र आणि शत्रु

आम्ही जी कुंडली बनवतो त्याचा प्रकार पिकासावर पाहण्यासाठी संपर्क करावा.
पिकासा शिवाय जन्म पत्रिकेचे मोड्युल, काही महत्वाचे अन्य पोस्ट आणि फोटो
तुम्ही येथे, या ब्लोगवर

या शिवाय आमच्या बाबत ईतर काही माहिती जाणुन घ्यायची असल्यास आमच्या
ईतर ब्लॉगवर जाणे तसेच, फेसबूकच्या माध्यमाने जाणुन घेणे.

श्री बाळकृष्ण महाराजांची अगदी थोडक्यात माहिती पुढील लिंक वरुन पहावी.
www.balkrishnamaharajm.blogspot.com
www.vedangee.blogspot.com
या ब्लोगवर मधुन मधुन पोस्टींग केले जात राहिल.

हा ब्लॉग कोणासाठी आहे..
१] ज्यांना योग्य मार्ग सापडत नाही.
२] चांगले सहकार्य सर्वांना करुन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सिध्दीस जावा यासाठी आणि
३] आमच्यावर निगेटिव्ह प्रेम करणारे [आमचेच अतिप्रेमाचे मंडळी] म्हणजे  ज्यांना आमच्या पासुन
काही फायदा होत नाही व फायदा घेता येऊ शकत नाही. उलट, जे अंतर यामी कुजलेले किंवा पोखरलेले असुन
मुळतः भित्रे आहेत.

______________________________________________________